दिवा भाजप व तन्वी फाऊंडेशन आयोजित उत्कृष्ट खाद्यपदार्थ स्पर्धा उत्साहात संपन्न.
ठाणे,दिवा ता 1 ऑक्टो ( संतोष पडवळ ) दिवा भाजप व तन्वी फाऊंडेशन तसेच भाजपा ठाणे शहर जिल्हाध्यक्ष श्री निरंजन डावखरे,भाजपा महिला मोर्चा ठाणे शहर अध्यक्षा सौ मृणाल पेंडसे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित उत्कृष्ट खाद्यपदार्थ स्पर्धा 2022 दिव्यातील येथील कै. संदिप पाटील नगर मध्ये उत्साहात पार पडल्या.प्रसंगी सदर स्पर्धेत दोनशे पेक्षा जास्त महिलांनी सहभाग घेतला असे तन्वी फाऊंडेशनच्या अध्यक्षा ज्योती राजकांत पाटील यांनी सांगितले
यावेळी महाराषट्र प्रदेश भटके विमुक्त आघाडी सरचिटणीस शिवाजी आव्हाड, ठाणे जिल्हा कार्यकारिणी सदस्य श्री विजय भोईर, भाजपा दिवा शहर अध्यक्ष श्री रोहीदास मुंडे, दिवा शहर सरचिटणीस समीर चव्हाण,युवराज यादव, माजी मंडळ अध्यक्ष सुधीर म्हात्रे, प्रविण पाटील, व्यापारी सेल शहर अध्यक्ष जयदिप भोईर, डाॅ विद्यासागर दुबे, आयोजक सौ.ज्योती राजकांत पाटील, सौ संगिता भोईर, निर्मला भोईर, अलका म्हात्रे, सौ.श्रेया परब, उज्वला चव्हाण, कोमल सावंत, सौ.नंदा कनसार, अमिता तांबे आदी मान्यवर उपस्थित होते.