दिवा शहरात मा. आमदार सुभाष भोईर फाउंडेशन आयोजित भव्य दिव्य रास गरबा..
ठाणे, दिवा ता 3 ऑक्टो (संतोष पडवळ): दिव्यातील प्रसिध्द रास दांडिया सुभाष भोईर फाउंडेशन आयोजित भव्य दिव्य रंगमंच व बँड पथक अशा लवाजम्या सहित दिव्यातील नागरिकांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज असे आयोजन करत सुभाष भोईर फाउंडेशन कडून रासगरबा सुरू आहे.दिव्यातील कानाकोपऱ्यातून लोक गरबा खेळण्यासाठी येत आहेत नागरिकांना अनेक सुविधा देत कोणतीही बाधा न आणता येथे बँड पथकाच्या तालावर डीजेच्या संगीतावर नृत्य गरबा खेळला जात आहे.
भोईर फाउंडेशन चे सुमित भोईर हे आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत व सन्मान करत रास दांडियाचे उत्कृष्ट असे नियोजन केले आहे दिव्यातील नागरिकांना मनोरंजनासाठी भव्यदिव्य व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.
मंडळाचे कार्यकर्ते देखील अथक परिश्रम घेताना दिसत आहेत यावेळी भोईर यांनी त्यांचे देखील आभार मानले प्रसंगी अनेक राजकीय पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहिले होते व दिव्यातील नागरिकांसाठी नेहमीच आम्ही तत्पर आहोत असे स्पष्ट केलं