टिटवाळ्यात सापडली सोने व्यापाऱ्याकडे अवैध सव्वा कोटींची रक्कम तर 56 लाखांचे सोने
कल्याण,टिटवाळा ता 3 (संतोष पडवळ) :- टिटवाळा रेल्वे स्टेशमध्ये तब्बल सव्वा कोटी रुपयांची रोख रक्कम व 56 लाखांचे बिना कागद सोने पकडण्यात टिटवाळा आरपीएफला यश आले असून एका इसमास अटक करण्यात रेल्वे पोलिसांना यश आलेले आहे.याबाबतचे सविस्तर वृत्त असे की 1 ऑक्टोबर रोजी 12533 पुष्पक एक्स्प्रेसमधून टिटवाळा प्लॅटफॉर्मवर एक व्यक्ती संशयास्पदरित्या खाली उतरली. त्यावेळी रेल्वे आरपीएफ चे कर्मचारी हेड कॉन्स्टेबल एल.बी.वाघ आणि एमएसएफ कर्मचारी शुभम खरे यांनी त्याला संशयावरून ताब्यात घेतले आणि पुढील चौकशीसाठी आरपीएफ टिटवाळा कार्यालय येथे आणले असता रेल्वे च्या आरपीएफ च्या महिला इन्स्पेक्टर टिटवाळा अंजनी बाबर यांनी त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता, त्या व्यक्तीने आपले नाव जीपी मोंडल राहणार कामोटे, नवी मुंबई असल्याचे सांगितले. त्याच्याकडे अधिक माहिती काढली असता तो सोन्याचा व्यापार करतो आणि तो लखनौहून आला होता. त्याच्या बॅगमधील सामग्रीबद्दल अधिक चौकशी केली असता, सुरुवातीला त्याने सांगण्यास टाळाटाळ केली मात्र पोलिसांनी आपल्या खाक्या दाखविण्याचे नाटक केले असता त्याने स्वेच्छेने बॅग उघडली आणि त्यातील सामग्री दाखलविली. सदरील बॅगेत भारतीय चलनाचे बंडल त्यात 500 रुपयांच्या 11200 नोटा अशी एकूण 56,00,000/- (रुपये 56 लाख) रुपये व ज पिवळे धातू आणि पिवळे दागिने प्रमाणित केले आहेत ते सोने एकूण मूल्याचे रु. 1,15,16,903/- (1 कोटी 15 लाख 16 हजार नऊशे आणि 3). एकूण रोख रक्कम आणि सोने किमतीचे अनुदान. 1,71,16,903/- (1 कोटी 71 लाख 16 हजार नऊशे 3) वरीलआणि दोन पिवळ्या धातूची बिस्किटे आणि सोन्याचे दागिने होते. त्याच्याकडे रोख रक्कम किंवा सोन्याची कोणतीही कागदपत्रे नव्हती. त्यामुळे आयकर अधिकाऱ्यांना माहिती देऊन पुढील कारवाईची विनंती केली.
त्यानुसार प्राप्तिकर अधिकारी श्री विजय माळवे आणि त्यांचे तीन आयकर निरीक्षक 02.10.22 रोजी RPF कार्यालय टिटवाळा येथे हजर झाले.
साक्षीदार आणि वरील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत रोख बंडलांची मोजणी करण्यात आली आणि त्यात 500 रुपयांच्या 11200 नोटा सापडल्या. 56,00,000/- (रुपये 56 लाख). अधिकृत गोल्ड व्हॅल्युअर देखील म्हटले जाते ज्याने पिवळे धातू आणि पिवळे सोने एकूण तब्बल मूल्याचे रु. 1,15,16,903/- (1 कोटी 15 लाख 16 हजार नऊशे 3 रुपये किमतीचे असा तब्बल एकूण 1,71,16,903/- (1 कोटी 71 लाख 16 हजार नऊशे 3 रुपयांचा मुद्देमाल सापडला. सदरील हे भारतीय चलन आणि सोन्याच्या अवैध वाहतुकीचे संशयित प्रकरण असल्याने पोलीस निरीक्षक अंजनी बाबर यांनी पुढील तपासासाठी हे प्रकरण आयकर प्राधिकरणाकडे सोपवण्यात आले.
या संदर्भात RPF टिटवाळा यांनी काळ्याबाजारात गुंतलेल्या गुन्हेगाराला पकडण्यासाठी कौतुकास्पद कामगिरी केली त्याबद्दल त्यांचे रेल्वे विभाग व नागरिकांतून मोठ्या प्रमाणात अभिनंदन केले जातेय. सदरील सोने व रोख टिटवाळा परिसरातील कोणत्या सोनाराना दिली जात होती. याबाबत रेल्वे पोलीस व आयकर विभाग अधिक तपास करीत आहेत.
—————————-
(फोटो आहे.)