दिव्यातून मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्यासाठी जाणार 50 बसेस -मा. उपमहापौर रमाकांत मढवी
ठाणे, दिवा, ता 4 ऑक्टोबर (संतोष पडवळ) : शिवसेनेचे यंदा दोन गट झाले असता शिंदे गट व ठाकरे गट त्यामुळे दरवर्षी होणारा यंदाचा दसरा मेळावा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.दिवा शहर ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जात असून येथे आठ ही नागरसेवक तेव्हाचे शिंदे गटाचे आहेत आता सात नगरसेवकांनी पाठिंबा देत एक नगरसेवक ठाकरे गटात सामील आहे असे समजते दिव्यातील शिवसेनेची शिदोरी शिंदे गटाचे मा. उपमहापौर रमाकांत मढवी जी यांच्या कडे आहे.
त्यांनी यावेळी दसरा मेळाव्याबद्दल काही निकटवर्तीयनी बोलताना स्पष्ट केले की दिव्यातील तमाम जनता ही मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाने व विचाराने पुढे जात असून दसरा मेळावा मध्ये विचाराचे सोन लुटण्यासाठी बी के सी वर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे त्यासाठी 50 एस टी बसेच ची उपलब्ध करून जवळ जवळ 15 ते 20 हजार नागरिक दिव्यातून दसरा मेळाव्यात हजर असतील असे त्यांच्या निकटवर्तीयनी स्पष्ट केलं