दिव्यातील आदर्श मित्र मंडळ व युवक प्रतिष्ठान आयोजित भव्य आरोग्य शिबीर उत्साहात पार
ठाणे, दिवा ता 4 ऑक्टो (संतोष पडवळ) : दिव्यातील आदर्श मित्र मंडळ तसेच युवक प्रतिष्ठान व भाजप ओबीसी मोर्चा अंतर्गत AKDN आरोग्य सेवा संस्था आयोजित भव्य आरोग्य शिबीर आयोजित केले होते. प्रसंगी सदर शिबिरात जेष्ठ नागरिकांसाठी अत्यल्प दरात कानाचे उच्च दर्जाचे मशीन पाचशे रुपयात वाटण्यात आले. तसेच सदर आरोग्य शिबिरात मधुमेह, उच्च रक्तदाब, रक्तातील होमोग्लोबिनचे प्रमाण, जनरल आरोग्य तपासणी, ओरल कॅन्सर तपासणी करण्यात आली प्रसंगी शेकडो नागरिकांनी सदर शिबिराचा फायदा घेतला. गेली पंधरा वर्षांपासून आदर्श मित्र मंडळ सामाजिक उपक्रम राबवत असते असे मंडळाचे श्री रोशन व सपना भगत यांनी सांगितले. प्रसंगी सदर मंडळास आमदार निरंजन डावखरे, आमदार राजू पाटील, मा उपमहापौर रमाकांत मढवी, भाजपचे जयदीप भोईर, समीर चव्हाण, रोहिदास मुंडे, ज्योती पाटील, गणेश भगत, विजय भोईर यांच्यासह अनेक मान्यवर व पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती लावली.