⭕️दिव्यात वारंवार होणारे अपघातबळी पार्श्वभूमीवर भारतीय मराठा संघांचे ठाणे आयुक्त व वाहतूक विभागास निवेदन.
ठाणे, दिवा, ता 8 ऑक्टो (संतोष पडवळ) दिव्यात वारंवार होणारे आपघातामुळे बळींच्या पार्श्वभूमीवर भारतीय मराठा संघांने आक्रमक होऊन दिवा प्रभाग समिती, मुंब्रा पोलीस स्टेशन, ठाणे मनपा आयुक्त व ठाणे वाहतूक विभागास निवेदन दिले आहे. दिवा शहरात कायम भेडसावणाऱ्या समस्या म्हणजे दिवा रेल्वे स्टेशन परिसर तेच दिवा- आगासन चौक येथे कायम ट्रॅफिकची समस्या, दुकानदारांचा व फेरीवाले यांचा पदपथावरील कब्जा यामुळे होणारे वारंवार अपघात.यामुळे सामान्य नागरीकांना जीव मुठीत घेऊन वाटचाल करावी लागत आहे.नुकतेच दिनांक ०६/१०/२२ रोजी दिवा शिळ रोड वर असाच एक अपघात होऊन एकाचा मृत्यू झाला. मागील काही महिन्यात अशा कित्येक समस्या घडलेल्या आहेत. या समस्यांवर तातडीने उपाय व्हावा व अशा सगळ्या घटना लवकरात लवकर आटोक्यात याव्यात याकरिता भारतीय मराठा संघ आक्रमक झाला आहे. याप्रसंगी भारतीय मराठा संघ संस्थापक अध्यक्ष अविनाश पवार,प्रदेश सचिव एस डी पाटील,उपाध्यक्ष दीपक पालांडे,ठाणे महानगर संपर्कप्रमुख अरुण फणसे, उद्योग आघाडी उपाध्यक्ष दिलीप लटके व दिवा शहर अध्यक्ष निकेश खानविलकर व इतर अनेक कार्यकर्त्यांनी निवेदन दिले.