दिव्यातील आदर्श मित्र मंडळ आयोजित श्री रोशन भगत यांच्या दिव्याच्या आई माऊलीची भव्यदिव्य मिरणूक व विसर्जन सोहळा उत्सहात पार
ठाणे, दिवा 8 ऑक्टोबर (संतोष पडवळ) :
दिव्यातील सुप्रसिद्ध मुब्रादेवी कॉलनीतील आदर्श मित्र मंडळ आयोजित नवरात्र उत्सव श्री रोशन भगत यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाला दिव्यातील भव्य दिव्य अशी आई माऊलीची विसर्जन मिरवणूक पाहून “याची देही याची डोळा”मन आनंदाने भरून आले.भव्य असे डीजे पथक व त्यावर उत्तम रोषणाईत तमाम दिवावासीयांना वेड लावून टाकणारी गाणे वाजत असताना हजारो महिला वर्ग ,जैष्ठ व्यक्ती ,युवावर्ग आपल्या तालात ,सुरात आई माऊलीच्या विसर्जन मिरवणुकीत नाचत गाजत होता मंडळाचे अद्यक्ष श्री रोशन भगत यांनी यावेळी बोलताना सांगितले की मुब्रादेवी कॉलनीतील हजारो माता भगिनी या उत्साहात सहभागी होत असून मनोभावे देवीची नऊ दिवस पुजाअर्चा केली जाते व दहाव्या दिवशी आई माऊलीची भव्य विसर्जन मिरवणूक काढली जाते यात हजारो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून शेवट प्रयन्त आई माउलीला भावपूर्ण निरोप देऊन घरी पारायण करतात.
रोशन भगत व सपना रोशन भगत दाम्पत्य गेल्या 15 वर्षा पासून मनोभावे देवीची स्थापना करत असून नऊ दिवस नऊ सामाजिक कार्यक्रमाचा भरणा देखील असतो त्यात मुब्रादेवी कॉलनीतील प्रत्येक नागरिक लाभ घेत आहे व सर्वांच्या आरोग्याची काळजी देखील घेतली जाते आरोग्य शिबीर,श्रवण यंत्रे वाटप,जैष्ठ दाखले वाटप व इतर सांस्कृतिक कार्यक्रमात प्रभागातील हजारो नागरिक सहभाग नोंदवत आहेत.
या मंडळाच्या नावातच आदर्श असून मंडळाचे अद्यक्ष देखील “रोशन”च आहेत त्यामुळे आमच्या आरोग्याची काळजी घेत रोशन भगत हे उकृष्ट असे समाजकार्य करत आहे असे काही जैष्ठ नागरिकांनी बोलताना स्पष्ट केले