मुंबई शहरातील स्वयंसहाय्य बचत गटातील महिलाकरीता महीला आर्थिक विकास दिवाळी मेळावा उत्सहात संपन्न

0

मुंबई, दि.११: मुंबई शहरातील बचत गटांनी उत्पादित केलेले साहित्य विक्रीसाठी सहा लोकसभा मतदारसंघात प्रत्येकी एक बचत गटांचा स्टॉलचे प्रदर्शन आयोजित करा. महिला बाल विकास विभाग आणि मुंबई महापालिका यांनी हा उपक्रम रोटेशन पद्धतीने उपक्रम राबवावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.

प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकॅडमी रवींद्र नाट्य मंदिर येथे महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत मुंबई शहरातील स्वयंसहायता बचत गटांचा आज आणि दिनांक १२ ऑक्टोबर रोजी मेळावा आयोजित केलेला आहे. मेळाव्याच्या उद्घाटन कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.

यावेळी महिला व बाल विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार तलीम सेलवन, मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, प्रधानसचिव आय.ए.कुंदन, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक रूबल अग्रवाल उपस्थित होत्या.

श्री.फडणवीस म्हणाले, प्रत्येक लोकसभा मतदारसंघात बचत गटांचे स्टॉल लावल्यास नागरिकांना देखील किफायतशीर किंमतीत वस्तू उपलब्ध होतील. मुंबई शहरातील बचत गटांसाठी दिवाळी सणापूर्वी हा मेळावा आयोजित केल्यामुळे,बचत गटांच्या उत्पादनांची विक्री होईल. आज महिलांना कर्ज देताना बँक सुद्धा पुढे येत आहेत. कारण महिला बचत गटांना दिलेले कर्ज महिला 100% परतफेड करतात त्याचबरोबर महिला देखील महिला बचत गटाचा उद्योग वाढवण्याबरोबर आपल्या कुटुंबाला देखील बचत गटाच्या माध्यमातून हातभार लावत असतात. महिला सक्षमीकरणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून अनेक नाविन्यपूर्ण योजना राबविण्यात येत आहे.माविम मार्फत उत्पादित वस्तूंचे पॅकेजिंग, ब्रॅण्डिंग यावर भर देण्यात यावा.

दिल्ली येथे भरवण्यात येणारे महिला बचत गटांचे प्रदर्शन तसेच सरस सारख्या प्रदर्शनांना खूप चांगला प्रतिसाद मिळत असतो त्यामुळे महिला बचत गटांच्या उत्पादित वस्तूंना चांगली बाजारपेठ मिळवून देणे यासाठी काम होणे गरजेचे आहे. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाची ही चळवळ वाढवण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे असेही ते म्हणाले

*बचत गटांच्या उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळून देणार : महिला बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा*

महिला बाल विकास मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले, सध्या कोरोना नंतर मोठ्या उत्साहात सर्व सण साजरे केले जात आहेत. शहरातील बचत गटांना प्रोत्साहन मिळावे यासाठी दोन दिवसीय दिवाळी मेळावा आयोजित केला आहे. मुंबई शहरातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा तसेच महिला बचत गट यांच्यासाठी विविध मार्गदर्शनपर व्याख्यान देखील ठेवले आहेत. महिला बचत गटांना राज्य केंद्रशासन आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या माध्यमातून राबवण्यात येणारे योजना एकत्रितपणे राबवून त्यांचा लाभ महिला बचत गटांना मिळावे यासाठी प्रयत्न करण्यात येतील. तसेच जागतिक दर्जाच्या कंपन्यांमध्ये महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या साहित्याची ऑनलाईन साहित्य विक्री व्हावी यासाठी देखील प्रयत्न करण्यात येतील. महिला बचत गटांचे उत्पन्न तिप्पट करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.

*गटांना बँकेमार्फत मंजूर कर्जाच्या धनादेशाचे वाटप*
रुपाली माने, सिद्धीविनायक महिला बचत गटा ला बँक ऑफ महाराष्ट्र कडून रुपये १० लाख ,अपर्णा कोरडे यांच्या हयात महिला बचत गटाला बँक ऑफ महाराष्ट्र कडून रुपये ७ लाख, बसलिम गम्मा मेकरी यांना आशू महिला बचत गट ला एचडी एफसी बँके कडून ९ लाख रुपये गटांना बँकेमार्फत मंजूर कर्जाच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले.

*महिला उद्योजकांना व्यावसायिक किटचे वाटप*
* श्रद्धा महिला बचत गटाच्या कविता कांबळे यांना ब्युटी पार्लर साहित्य,संकल्प महिला बचत गटाच्या मनाली सावंत यांना शिलाई मशीन,पंचशील बचत गटाच्या वनिता सुखदान यांनी किचन सेट अप चे वितरण करण्यात आले.

*यशस्वी महिला उद्योजकांची माहिती*
स्पार्कल महिला बचत गटाच्या स्नेहा भालेराव इलेक्ट्रोफाइल रिसायकलिन व्यवसाय, मदर सेंट मेरी महिला बचत गटाच्या जयश्री भंडारी अंगणवाडी पोषण आहार व कटरिंग, भिमाई महिला बचत गट श्रीमती कमल सोनवणे मसाला व्यवसाय बद्दल सत्कार करण्यात आला.

*बचत गट स्टॉल ला मान्यवरांनी दिली भेट*

माविम मार्फत ९० स्टॉल लावण्यात आले आहेत. दिवाळी सणा निम्मित वेगवेगळ्या प्रकारचे कंदील त्यात बांबूचे कंदिल, घरगुती फराळ, बांबूच्या परड्या वारली पेंटिंगचे दिवे, विशिष्ट प्रकारचे तोरण, साड्या पासून बनवलेले कागदपत्र फोल्डर, घरगुती ज्वेलरी, काथ्यापासून बनवलेली उत्पादने यांचा समावेश आहे. यावेळी सर्व मान्यवरांनी स्वयंसहाय्यता बचत गट उत्पादित वस्तू प्रदर्शनाला भेट देऊन तेथील बचत गटांसमवेत संवाद साध ला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक रूबल अग्रवाल यांनी मानले. आभार माविमाच्या महाव्यवस्थापक कुसुम बाळ सराफ यांनी मानले. सूत्रसंचालन चैताली कानेटकर यांनी केले.

******

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!