ठाण्यात धक्कादायक प्रकार रिक्षाचालकाने केला बावीस वर्षीय मुलीचा विनयभंग
ठाणे दि.१४ (संतोष पडवळ) : ठाण्यात स्टेशन रोड वर धक्कादायक प्रकार घडला आहे रिक्षाचालकांने २२ वर्षीय तरुणीचा विनयभंग करून रिक्षाचालक फरार आहे.
ठाण्यातील स्टेशन रोड परिसरात सकाळी सात वाजता रिक्षावाल्याने एका बावीस वर्षीय मुलीला बघून आक्षेपार्य विधान केल्या मुळे संतप्त मुलीने रिक्षाचालकाला प्रतिकार करत त्याचा हात पकडत जाब विचारला असता रिक्षाचालकांच्या तेथून पळ काढला. मुलीचे हे तिच्या जीवावर बेतले असते. कारण रिक्षाचालक पळ काढण्याच्या प्रयत्नात मुलीला फरफटत घेऊन जात असताना मुलगी पडली सुदैवाने तिला काही झाले नाही. ही सगळी दृष्य सिसिटीव्ही मध्ये कैद झाली आहे., या झालेल्या प्रकारा बद्दल ठाणे नगर पोलीस स्टेशन मध्ये रिक्षावाल्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पोलीस रिक्षाचालकांचा शोध घेत आहेत.