ठाणे जिल्हा वृत्तपत्र विक्रेता सेनेतर्फे वृत्तपत्र विक्रेता दिन उत्साहात साजरा.
ठाणे, ता 15 ऑक्टोबर (संतोष पडवळ) : गेली अनेक वर्षांपासून 15 ऑक्टोबर हा वर्तमान पत्र विक्रेता दिवस म्हणून साजरा केला जातो त्याचेच औचित्य साधून आज ठाणे शहरातील ठाणे जिल्हा वृत्तपत्र विक्रेता सेनेतर्फे वृत्तपत्र विक्रेता दिन उत्साहात साजरा केला. दररोज पहाटे चार वाजल्यापासून वर्तमानपत्र घरोघरी वितरणाचे काम करणारे विक्रेते 15 ऑक्टोबरला एकत्र येऊन केक कापून साजरा करतात, प्रसंगी ठाणे जिल्हा वृत्तपत्र विक्रेता सेनेचे श्री विष्णू सावंत, संतोष विचारे , बाळू भोसले, समीर कोरे, दीपक सोंडकर यांच्यासह अनेक वर्तमानपत्र विक्रेते व सर्व वर्तमानपत्र कंपनीचे प्रतिनिधी हजर होते.