हास्यअभिनेत्री नम्रता संभेराव यांची ठाण्यात मतिमंद व बहुविकलांग मुलांसोबत दिवाळी साजरी.
ठाणे, ता 21 (संतोष पडवळ) : जिव्हाळा ट्रस्ट ठाणे संचालित उभारी मतिमंद व बहुविकलांग मुलांनसोबत प्रसिध्द हास्य अभिनेत्री नम्रता आवटे संभेराव यांनी मोठया उत्साहात दिवाळी साजरी केली.
‘जिव्हाळा ट्रस्ट’ ठाणे समाजाच्या दृष्टीने मतिमंद, बहुविकलांग आणि पर्यायाने नावडती ठरलेली ही मुलं समाजात परस्पर जिव्हाळा, सुख-आनंद व्यक्त करण्यासाठी वापरात येणा-या अशा अनेकविध साधनांची निर्माती बनली आहेत. सुगंधी उदबत्त्या, बांधणीच्या डिझायनर पणत्या, उटणे, पेपर द्रोण, वेगवेगळ्या आकाराच्या प्लेट्स, कागदी/ कापडी पिशव्या, डिझायनर लिफाफे, मण्यांचे नेकलेस, ब्रेसलेट्स, मेणाची फुले (फ्लोटिंग कैंडल्स), नक्षीकाम केलेल्या फुलदाण्या वगैरे उत्पादने ती इतक्या प्रावीण्याने घडवितात की वापरात येणा-या अशा अनेकविध साधनांची निर्माती बनली आहेत.
प्रसंगी जिव्हाळा ट्रस्टचे श्री. राजेश रुके आणि श्रीमती जयश्री रुके तसेच शिक्षिका शुभांगी परब व आरती चिले यांच्यासह पालक रोशनी रुके , सुमेधा विचारे,अजुॆन सावंत,राजेंद्र कोरडे,मिलिंद कदम यांचे खूप मोलाचे सहकायॆ लाभले.