श्री.छत्रपती शंभूराजे संघटना दिवा शहर आयोजित भव्य दिव्य दिवाळी पहाट उत्साहात संपन्न
ठाणे, दिवा ता 25, (संतोष पडवळ) : दिवा शहरात दरवर्षी प्रमाणे यंदाही दिवेकरांनसाठी श्री.छत्रपती शंभूराजे संघटनेने भव्यदिव्य अशा सुसंध दिवाळी पहाटेच आयोजन दिवा दतीवली तलाव येथे करत दीपोत्सव देखील आयोजित करण्यात आला भव्य अशी सुंदर रांगोळी काढून नेत्र दीपक रोषणाईने संपूर्ण तलाव झळकत होते .या प्रसंगी दिव्यातील शेकडो नागरिकांनी यात सहभागी होत एक दिवा प्रज्वलित करत दिवाळी पहाट चा आनंद द्विगुणिक केला.
यावेळी कार्यक्रमाचे आयोजक व संघटनेचे अध्यक्ष मा.राजेश पाटील यांनी येणाऱ्या मान्यवरांचे स्वागत करत अनेकांना सन्मानित केले.भाव गीत,लोकगीत अशा अशा सांस्कृतिक कार्यक्रमाची यंदा दिवेकरांना पर्वणीच पहाण्यास मिळाली.अनेक बाल कलाकारांनी सुंदर नृत्य करत उपस्थिततांची मने जिकली तसेच टाळ व मृदंगच्या घेऊ वारकरी देखील या उपक्रमात सहभागी झाले होते.
दीपावली सणाच्या उत्सवात अशा सुंदर कार्यक्रमाचे आयोजन करत श्री.छत्रपती शंभूराजे संघटनेने दिवेकराचा आनंद द्विगुणित करत पुढेही असेच उपक्रम संघटनेने सुरू ठेवावेत असे काही जैष्ठ व्यक्तींनी यावेळी बोलताना सांगितले व संघटनेचे अद्यक्ष व आयोजक श्री.राजेश पाटील व पदाधिकारी यांचे ही सर्व दिवेकरांच्या वतीने अभिनंदन करत कार्यक्रम यशस्वीपणे सपन्न झाला