अखिल भांडुप कलाकार कट्ट्याच्या सुरेल गाण्यांच्या “सांज स्वरांची”कार्यक्रमात श्रोत्यांनी घेतला संगीत फराळाचा आस्वाद
मुंबई, ता 26 ऑक्टोबर (किशोर गावडे) : दीपावलीची पहाट त्यातच थंडीचा गारवा , दिव्यांचा आनंदाचा आणि संस्कृतीचा सण या सणानिमित्त बच्चे कंपनी पासून ज्येष्ठां पर्यंत सर्वत्र आनंद आणि विविध कार्यक्रमाची रेलचेल पाहायला मिळते. त्यात सुरांच्या अविष्कारानांही अन्यय साधारण महत्त्व आहे. आणि त्यामध्ये सुश्राव्य सुरेल गाण्यांच्या मैफिलीने भांडुप मध्ये
अखिल भांडुप कलाकार कट्टा आयोजित “सांज स्वरांची” हा मराठी वाद्यवृंदाचा अप्रतिम कार्यक्रम
मंगळवारी सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज तलाव, येथे संपन्न झाला.
अखिल भांडुप कलाकार कट्टा निर्मित सुरेल गाण्यांच्या मैफिलीने श्रोते मंत्रमुग्ध झाले होते. अभिनय सम्राट सुजय बागवे व उत्कृष्ट सादरीकरण करणारे निवेदक समीर नार्वेकर यांच्या खुमासदार शैलीने कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच श्रोत्यांची मने जिंकली.
गायक विजयशिंदे,जे डी.जगताप,राजेश आयरे,प्रमोद राडये
सतिश तावडे,दिक्षा देठे,ऋतू,आस्था पिंपळकर,दिपिका दणदणे,सुनिल कदम, नंदेश या गायक मंडळींनी गाण्यांची सुरेल मैफल सादर केली. एकाहून एक गीते सादर करीत त्यांनी रसिकांची वाहव्वा मिळवली.तर मधुकर विचारे, निवृत्ती बने, हितांशी अहिरे, नीलम राजपुरे ,चिम्मयी महामुनी, अक्षता जाधव, वेदिका पवार,या कलाकारांनी आपल्या शैलीत शानदार नृत्ये सादर केली.तर
प्रसन्न सावंत,गौरव साळवी,योगेश जोशी,रुणाल सावंत, यांनी दिलेली वाद्य वृंदावरची साथ ही तेवढीच ताकतीची होती.
यावेळी, माजी आमदार अशोक पाटील, उद्योजक सतिश अधिकारी आमदार रमेश कोरगावकर, राजश्री मांदविलकर, नेहा पाटकर , प्रकाश माने, प्रकाश सकपाळ, अमित डिचोलकर, अश्विनी बने,संजय दुडे ,राजेश कदम,
प्रविण दहितूले,अनिल राजभोज,संतोष पार्टे,प्रिया जाधव,नम्रता राणे,सागर जोशी आदी उपस्थित होते.
मंगळवारी सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज तलाव परिसरातील
वातावरण प्रफुल्लित व उल्हासमय झाले होते.