रंगावलीकार शुभम सुर्वेने रेखाटला अनोखा ” रंगोत्सव”
मुंबई, ता,26 ऑक्टोबर (किशोर गावडे) : दिवाळी आली की विविध गोष्टी पहायला मिळतात्,मग त्या डिझायनर पणत्या असोत्,नव्या आकाराचे कंदील असोत वा दिवाळी अंक असोत…याच प्रमाणे दिवाळीत आवार्जुन पहायला मिळते ते म्हणजे रांगोळी ..
अशीच एका भांडुपच्या धैर्यशील तरुणाने मनाशी जिद्द चिकाटीने आपल्या रहात्या घरातच “रंगोत्सवाचे” दालन केल आहे. शुभम दिलीप सुर्वे.या २२ वर्षाच्या तरूणाने आदर्श सोसायटी कोकण नगर भांडुप पश्चिम येथे घरातच रांगोळीचे भव्य दालनं उभे केले आहे.शुभमला त्यांच्या मातोश्रीने रांगोळीची कला अवगत केली. हे परमेश्वराचेच देणे आहे व आई कडून मिळालेले बाळकडू आहे असे शुभम अभिमानाने सांगतो.
विशेष म्हणजे काही कलाशाखेचे ज्ञान नसतानाही ना त्यात कोणते शिक्षण घेतलेले नसतानाही अनेक रांगोळ्या रेखाटल्या गेल्या आहेत.आईची रांगोळी ही टिपक्यांची असायची तरी एवढी सुंदर काढायची की तेव्हा देखील तिला स्पर्धेत पारितोषिक मिळायचचं.असेही शुभमने बोलताना सांगितले.
आईकडूनच त्याला ही कला अवगत झाली. आणि अगदी लहानपणापासून आवड निर्माण झाली आणि त्याने
श्रीमंत दगडुशेठ गणपती पासून, अटलबिहारी वाजपेयी,बाबा आमटे,जय मल्हार, नटसम्राट नाना पाटेकर, छत्रपती शिवाजी महाराज, महालक्ष्मी, साईबाबा, विठ्ठल रखुमाई, रांगोळी काढायला सुरुवात केलेली ती आज प्रख्यात धर्मवीर आनंद दिघे साहेबांपर्यंत पोहचली. अनेक रांगोळ्या पहाताना शुभमचे सर्वत्र कौतुक होत आहे. कोकण नगरात नागरिकांना एक पर्वणीच आहे.