बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाच्या विक्रोळी विभागातर्फे जेष्ठ वृत्तपत्र विक्रेते व कंपनी पदाधिकारी यांचा सन्मान सोहळा.
मुंबई, ता 27 (संतोष पडवळ): बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघ विक्रोळी विभागातर्फे जेष्ठ वृत्तपत्र विक्रेते व कंपनी पदाधिकारी यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. दिपावली निमित्त वरील सोहळ्याचे आयोजन विक्रोळी वृत्तपत्र विक्रेता संघाचे अद्यक्ष श्री भालचंद्र पाटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले होते. संघटनेच्या सौ. सुनीता सूर्यवंशी ताईंनी दिवाळीचे सगळ्यांना औक्षण करून शुभेच्छा दिल्या.
जेष्ठ वृत्तपत्र विक्रेते श्री जयप्रकाश सावळाराम मुंज / श्री अविनाश विनायक रेपाळ / श्री मारुती यशवंत दळवी तसेच हिंदुस्थान टाइम्स दैनिकाचे माजी अधिकारी श्री बाबा चव्हाण व श्री रवींद्र भट्ट यांचा सन्मान करण्यात आला. ह्या सर्वाना संघटनेतर्फे चांदीची भेट वस्तू व मिठाई देऊन गौरविण्यात आले.तसेच मुंबईतील वृत्तपत्र विक्रेते प्रतिनिधी व कंपनीच्या पदाधिकाऱ्यांना मिठाई देऊन दिवाळी साजरी करण्यात आली.
ह्या प्रसंगी लोकसत्ता ग्रुपचे हेड श्री धीरज सरांनी कार्यक्रमाचे कौतुक करून आम्ही नेहमीच विक्रेत्यांसोबत राहू असे आश्वासन दिले. तसेच काही विक्रेत्यांनी संघटनेचे सल्लागार श्री पवन अग्रवाल सरांना नवीन टॉवर मध्ये पेपर टाकायला जाणाऱ्या मुलांना लिफ्टचा वापर करू देत नसल्याचा तक्रारी करण्यात आल्या. त्यावेळीं श्री पवन अग्रवाल सरांनी सांगितले की जिथे कुठेही तुम्हाला अडचण येईल त्याठिकाणी मी स्वतः येऊन आपली तक्रार तिथल्या कमिटी सोबत बोलून सोडवेन त्याची चिंता करायची गरज नाही. जिथे जिथे अडचण येईल तिथे तिथे मी स्वतः येईन.
संघटनेचे आधार स्तंभ शिवसेना उपविभाग प्रमुख श्री प्रकाश वाणी ह्यांनी ही ह्यावेळी मार्गदर्शन केले. उदोयजक श्री दशरथ येवले सरांनी दिवाळी कार्यक्रमाचे कौतुक केले.
ह्या आनंददायी सोहळ्यात बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे विविध भागातील पधादिकरी आले होते. श्री हेमंत मोरे श्री प्रकाश गिलबिले सौ सविता गिलबिले श्री अजय उतेकर श्री शशी श्री सुनील म्हापनकर अध्यक्ष श्री भालचंद्र पाटे ह्यांनी इतक्या पहाटे ह्या कार्यक्रमास सर्व उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार मानले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्थानिक संघटनेचे श्री सुनील बनकर श्री रवी अमृतकर श्री सचिन साळुंके श्री सागर देव श्री विश्वनाथ सावंत ह्यांनी परिश्रम घेतले.