दिवा उपशहरप्रमुख सचिन राम पाटील यांस कडून उत्तर भारतीयांसाठी भव्य छटपूजेचे आयोजन
ठाणे, दिवा, ता 31 ऑक्टोबर (संतोष पडवळ) :
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे दिवा उपशहरप्रमुख सचिन राम पाटील आयोजित छट पूजा स्वर्गीय जयराम मांगळ्या पाटील गणेश विसर्जन घाट येथे आयोजित करण्यात आले . ह्या ठिकाणी मोठ्या संख्येने उत्तर भारतीय महिला भगिनी आणि बाधव सहभाग घेतला. ज्येष्ठ शिवसैनिक राम पाटील, माजी नगरसेविका सौ अंकिता विजय पाटील, चेतन पाटील, विजय पाटील, युवा सेनेचे अभिषेक ठाकूर, उपशहर संघटक सौ. प्रियांका सावंत, मचिंद्र लाड, सौ. स्मिता जाधव, प्रतीक म्हात्रे, ओकेश भगत, महेश शितकर, मोहित गुप्ता, आकाश शुक्ला, संतोष कदम, नितेश पाटील, तुषार सावंत, अनिल साळवे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.