दिवा शहरात शिवसेनेसह भाजपकडून पारंपारिक पद्धतीने छटपूजा साजरी
ठाणे,दिवा ता 31(संतोष पडवळ ) दिवा शहरातील गणेश तलाव येथे मावळत्या सुर्यदेवाला अर्ध्य अर्पण करुन छटपूजा उत्साहात साजरी करण्यात आली.पारंपारिक पद्धतीने सुर्यदेवाला आराधणा करण्यात आली.यावेळी गणेश तलावाजवळ मोठ्याप्रमाणात नागरिकांची गर्दी दिसून आली.कोविडनंतर पहिल्यांदाच छठपूजेचा सण निर्बंधमुक्त साजरा करता आल्याने उत्तर भारतीयांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले.
उत्तर भारतातील उत्तरप्रदेश,बिहार,झारखंड,पश्चिम बंगाल व इतर राज्यातील सर्वात मोठा उत्सव छठपूजा आहे.छठी मैया,देवी प्रकृतीचे सहावे रुप आणि भगवान सुर्याची बहीण ही उत्सवाची देवी म्हणून पूजली जाते.हिंदू कँलेंडर नुसार आँक्टोबर महिन्यात दिपावलीच्या सहाव्या दिवसानंतर हा सण साजरा केला जातो.
दिवा शहरामध्ये हजारोंच्या संख्येने मुळचे उत्तर भारतातील रहिवासी गेल्या २० ते ३० वर्षापासून स्थायिक झाले आहेत.हजारोंच्या संख्येने मुळचे उत्तर भारतातील रहिवासी शहरातील गणेश तलाव येथे आज काल सायंकाळी छठपूजा निमीत्त सुर्य देवा अर्ध्य अर्पण करण्यासाठी जमले होते.
उत्तर भारतीयांचा हा महत्वाचा सण असल्यामुळे शहरातील विविध राजकीय संघटनांपैकी भाजपा दिवा शहर,शिवसेना (शिंदे गट) यांच्याकडून गणेश तलाव येथे भाविकांना मंडप,चहा,नाश्ता आदींसह विशेष सुविधा उपलब्ध करुन दिल्या होत्या.तर उद्धव ठाकरे गटाचे दिवा उपशहरप्रमुख श्री सचिन पाटील यांनीही नागरिकांसाठी साबेगाव येथे घाट उपलब्ध करुन दिला होता.व्रत असलेल्या महिलांनी सुपामध्ये फळे व दिवा ठेवून तलावाजवळ गेल्या.त्यांनी मावळत्या सुर्याची पूजा केली