दिव्यात “देव झाला डफलीवाला” या भाजप आयोजित दशावतारी नाटकास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
ठाणे, दिवा ता 7 नोव्हे (संतोष पडवळ) :- भाजप दिवा शहर व सिंधुदुर्ग रहिवाशी संघ, बेडेकर नगर, दिवा आयोजित दशावतार नाटकाला दिवा परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
दिव्यात ओम वीरभद्र दशावतार नाट्य मंडळ भांडुप यांचे पौराणिक दशावतार नाटक “देव झाला डफलीवाला” या दशावतार नाटकासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे दिवा शहर मंडळ अध्यक्ष रोहिदास मुंडे, महिला मंडळ अध्यक्षा ज्योती पाटील, प्रिया ठाकूर, विनोद भगत, प्रकाश पाटील, ठाणे जिल्हा कार्यकारणी सदस्य विजय भोईर, ठाणे उपाध्यक्ष नरेश पवार, कल्पना पाटील, गणेश नेवगे, उमेश घोगळे, सरचिटणीस समीर चव्हाण, अशोक पाटील, रोशन भगत, जयदीप भोईर, श्रीधर अजय सिंग अवदराज, विरेद गुप्ता, युवराज यादव, नणेश नगर वार्ड अध्यक्ष नागेश पवार अमरनाथ गुप्ता, आदी उपस्थित होते.