घरफोडी चोरी करणाऱ्या आरोपीतास अटक करुन २६,६०,०००/- रुपये किंमतीची रोख रक्कम व सोन्याचे दागीने हस्तगत गुन्हे शाखा कक्ष १, काशिमीरा यांची कामगिरी.
ठाणे, ता 7 नोव्हे (संतोष पडवळ) : दिनांक ०४.११.२०२२ रोजी रात्री ०९:०० ते ११-१५ वाजताच्या दरम्यान, बी / ६०४ ची / दिग विंगस्टोन बिल्डींग, १५ नंबर बस स्टॉप, मिरारोड पूर्व ता.जि.ठाणे येथे फिर्यादी श्रीमती तरन्नुम जावेद खान वय ३० वर्ष, रा. वरील प्रमाणे यांचे रहाते घरातुन घराचे लॅच तोडून घरातील लोखंडी कपाटात ठेवलेले १) २५,००,०००/-रु. रोख ५०० रुपयांच्या भारतीय चलनाच्या नोटा, २) १,२०,०००/- रु. किमतीचे ३० ग्रॅम वजनाची सोन्याची चैन जु.पा. ३) ४०,०००/-रु. किमतीचे १० ग्रॅम वजनाचे कानातील झुमके जु.पा. असा एकुण २६,६०,०००/-रु. किमतीची रोख रक्कम व सोन्याचे दागीने अज्ञात चोरटयाने फिर्यादीचे समतीशिवाय लबाडीच्या इरादयाने चोरून नेले बाबत दिले फिर्यादी वरुन मिरारोड पोलीस ठाण्यात गु.जि.क्र.- ४५६/२२ भा.द.वि.स. कलम ४५७, ३८० प्रमाणे दिनांक ०५/११/२०१२ रोजी गुन्हा दाखल दाखल करण्यात आला होता,
सदर गुन्हयाचा गुन्हे शाखा, कर-१ काशिमीरा यांचेकडून गुन्हयाचे घटनास्थळाची पाहणी करून घटनास्थळावरुन मिळुन आलेल्या तांत्रिक माहितीच्या आधारे व फिर्यादीकडून तपासात मिळून आलेल्या माहितीप्रमाणे सदरचा गुन्हा हा फिर्यादी यांचा भाऊ फरमान जावेद खान, व्यवसाय रिक्षा ड्रायव्हर, सध्या रा. प्लॉट नं. २०, मालवणी गेट नं.५, मदर टेरेसा स्कुल जवळ, मालवणी मालाड, प. याने केला असल्याचा संशय आल्याने सदर संशयित याचा शोध घेता तो त्याची पत्नी व मुलगा व मेहुणी सोबत कोठेतरी निघुन गेला असल्याची माहिती मिळाली. सदर माहितीच्या अनुषंगाने संशयित याचा सदर ठिकाणी मिळालेल्या तांत्रिक माहितीनुसार गुन्हे शाखा कक्ष-१ चे अधिकारी व अंमलदार यांच्या तीन वेगवेगळया टिम तयार करून तपास पथके शोध घेण्याकामी पाठविण्यात आले. सदर टिमकडून वेगवेगळ्या रेल्वे स्टेशन वरून मिळविण्यात आलेल्या तांत्रिक माहितीचे विश्लेषण करून आरोपीत हा गुजरात राज्यात पळून जात असल्याचे दिसून आले. त्याप्रमाणे तपास पथकाने आरोपीत याचा वापी, सूरत, वलसाड परिसरात शोध घेत असतांना आरोपीत हा वलसाड, राज्य गुजरात येथे मिळून आल्याने त्यास दिनांक ०६/११/२०२२ रोजी ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपीत याचे कडून सदर गुन्हयांतील घरफोडी चोरी करून नेलेल्या मालमत्तेतील २५,२४,५००/-रुपये रोख रक्कम व गुन्हयांत वापरलेले ०६ मोबाइल फोन असा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहेत.
सदरची कामगिरी श्री. विजयकांत सागर, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, श्री. अमोल मांडवे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा कक्ष काशिमीरा नेमणुकीतील पो.नि. अविराज कुराडे,
स.पो.नि. पुष्पराज सुर्वे, पोउपनिरी, हितेंद्र विचारे, सफी, राजु तांबे, संदीप शिंदे, किशोर बाडीले, पो.हवा. संजय शिंदे, संतोष लांडगे, पुष्पेंद्र थापा, विजय गायकवाड, प्रफुल्ल पाटील, विकास राजपूत, सचिन सावंत, समीर यादव, प्रशांत विसपुते, पो.शि. सनी सुर्यवंशी यांनी केलेली आहे.