⭕️ ठाणे जिल्ह्यातील दिवा शहरातील कु. अजय भोईर ची राष्ट्रीय एथलेटिक स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी.
ठाणे, दिवा : ठाणे जिल्ह्यातील दिवा शहरातील कु. अजय भोईर ची राष्ट्रीय एथलेटिक स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी पाहवयास मिळाली आहे.बालेवाडी पुणे येथे ४/११/२०२२ ते ६/११/२०२२ रोजी आयोजित केलेल्या राष्ट्रीय एथलेटिक स्पर्धेत संपूर्ण भारतातून ठाण्यासारख्या जिल्ह्याला परत एकदा मान मिळवून देण्याचे काम कु. अथर्व अजय भोईर याने केले आहे. त्याने १०० व २०० मिटर धावण्याच्या स्पर्धेत कांस्य पदक तसेच १०० मी रिले धावण्याच्या स्पर्धेत रौप्य पदक प्राप्त केले. त्याच्या या कामगिरीने ठाणे जिल्याची शान तर वाढलीच आहे तसेच संपूर्ण भोईर कुटुंबियांना हा राष्ट्रीय सन्मान मिळाला आहे. त्याची ही घोडदौड आणि पदकांची लयलूट अशीच सुरू राहो ही परमेश्वराला प्रार्थना.