मुंबई,10 नोव्हेंबर ( किशोर गावडे) :महाराष्ट्र नवनिर्माण सेना भांडुप विधानसभा व उत्सव परिवार व समर्थ प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने भांडुपच्या पराग विद्यालयाच्या प्रांगणात 18.19. 20 नोव्हेंबर 2022 या तीन दिवसांच्या कालावधीत महामिसळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.भांडुप विधानसभा मनसे विभाग अध्यक्ष मार्गदर्शक हे संदिप जळगावकर असून. मुख्य संयोजक म्हणून राजगड शाखा 114 महिला शाखाध्यक्षा सौ.सुप्रिया सुजय धुरत आहेत. 18 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता महामिसळ महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.

भांडुप वासियांना झणझणीत आणि चमचमीत मिसळीचा आस्वाद घेता येणार आहे.या महोत्सवात महाराष्ट्रातील कोल्हापूर, पुणे ,सातारा, सांगली, नाशिक ,या ठिकाणच्या प्रसिद्ध मिसळीची चव खवय्यांना घेता येणार आहे.या महोत्सवात नाद खुळा, स्वाद, तात्यांची मिसळ, स्वादिष्ट चमचमीत मसालेदार मिसळ,माऊली मिसळ, राजेशही स्पेशल कोल्हापुरी मिसळ, मुंबईची मिसळ, पुणेरी मिसळ, खानदेशी मिसळ, व तांबडा रस्सा व पांढरा रस्सा अशा विविध प्रकारच्या मिसळीचा आस्वाद भांडुप करांना चाखता येणार आहे .

मिसळ आणि मराठी माणूस यांचे नाते अतूट आहे.
हे नाते आता आणखी घट्ट होणार आहे. खवय्यांना चमचमीत झणझणीत खान्देशी तरी‌दार मेजवानी दिली जाणार आहे.प्रत्येकाला काही ना काही तरी खाद्यपदार्थ खाण्याची आवड असते. मग हेच खाद्यपदार्थ शोधत आपण अनेक ठिकाणी भ्रमंती करत असतो आणि त्या ठिकाणी जाऊन आपला आवडता पदार्थ मनसोक्त खाऊन तृप्त होत असतो… मात्र असाच जो पदार्थ तो सगळ्यांना आवडतो त्याच पदार्थाचे विविध प्रकार जर तुम्हाला एकाच ठिकाणी खायला मिळाले तर कसं… होय असाच एक महामिसळ महोत्सवाचे आयोजन होत आहे.

भांडुपकर खवय्यांसाठी महामेजवानी असून महाराष्ट्राची आवडती असलेली वेगवेगळ्या चवींच्या मिसळीचा आस्वाद घेत सर्वांनी उपस्थित राहावे असे महामिसळ महोत्सवाचे आयोजक सुजय धुरत यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. ज्याना या मिसळ महोत्सवात सहभागी व्हायचे असेल त्यानी 9987173034 या नंबरवर संपर्क साधावा

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!