ज्येष्ठ नागरिक संघाचा अनोखा उपक्रम
मुंबई,मुलुंड, ता. ८ ( दीपेश मोरे ) : साने गुरुजी ज्येष्ठ नागरिक मित्र मंडळ, कळवा खारेगांव हा कट्टा ज्येष्ठ नागरिक कट्टा म्हणून प्रसिद्ध आहे. या संघातर्फे अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात. याच अनुषंगाने रविवारी (ता. ६) या कट्ट्यावर संगमेश्वर येथील दिलीप जाधव यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी मा. आमदार सुभाष बने, माजी नगरसेवक मनोहर सुर्वे, नेहा माने, स्मिता बने या देखील उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ ग्रामस्थ रामचंद्र साळवी होते रोज सकाळी या मंडळातर्फे ओमकार, साने गुरुजी प्रार्थना, सुविचार, दिनविशेष, ज्ञानेश्वरी अध्याय वाचन व निरूपण, अभंग, भक्ती गीते व मनोगते आदी कार्यक्रम होतात.