दिव्यात भाजपच्या ज्योती पाटील यांच्या पुढाकाराने 150 महिलांची जनधन खाती उघडली ; 2 लाख अपघाती विम्याचे संरक्षण.
ठाणे,दिवा ता 10 नोव्हे (संतोष पडवळ )दिव्यातील विविध समाजातील दुर्लक्षित घटकांच्या सर्वकष आर्थिक विकासासाठी,तसेच दिव्यातील अल्प उत्पन्न गट आणि दुर्बल घटकांसारखा वर्ग ज्यांच्यापर्यंत अजूनही मूलभूत बँकींस सेवाही पोहचलेल्या नाहीत अश्या वर्गाला परवडणाऱ्या दरात आणि वेळेत योग्य आर्थिक सेवा पुरविणे म्हणजेच आर्थिक समावेशन करण्यासाठी भाजपा दिवा शहर महिला मोर्चा अध्यक्षा सौ.ज्योती राजकांत पाटील यांच्या पुढाकारामुळे महिलांसाठी 150 जनधन खाती गेल्या दोन दिवसात उघडण्यात आली आहेत.सौ.ज्योती राजकांत पाटील या गेल्या तीन दिवसांपासून महिलांना आर्थिक व्यवस्थेत आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
प्रधानमंत्री योजनेला आता 8 वर्षे झाली आहेत.पंतप्रधान जनधन योजना ही केवळ भारतातच नव्हे तर जगभरात आर्थिक समावेशनाच्या दिशेने सर्वात दूरगामी परिमाण साधणाऱ्या उपाययोजनांपैकी एक आहे.आर्थिक समावेशनामुळेच सर्वसमावेशक विकास शक्य आहे.या योजनेमुळे दिव्यातील गरीबांना आपली आर्थिक औपचारिक आर्थिक व्यवस्थेत आणण्याचा,तसेच लुबाडणुक करणाऱ्या सावकारांच्या तावडीतून सुटका करुन देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या योजनेंतर्गत सेंट्रल बँक आँफ इंडियाचे कर्मचारी येथील तन्वी फाऊंडेशनच्या कार्यालयात स्वत उपस्थित राहून गेल्या दोन दिवसांपासून जनधन खाते योजनेची माहीत देत आहेत.या योजनेता महिलांना कोणता लाभ मिळू शकतो याविषयी मार्गदर्शनही करण्यात येत आहे.थेट लाभ हस्तांतरण,कोविड सारख्या काळातही केंद्राकडून मिळालेला आर्थिक लाभ,प्रधानमंत्री किसान योजना,मनरेगा अंतर्गत दिला जाणारा वाढीव मोबदला,जीवन आणि आरोग्य विमा संरक्षण या जनधन योजनेच्या माध्यमातून मिळू शकणार आहे. https://youtu.be/PtFO9pHIdqQ
या योजनेची सर्वात मोठी खासियत आहे की,रकमेशिवाय आणि कमीत कमी कागदपत्रांच्य आधारे कोणतीही व्यक्त बँकेत खाती उघडू शकते.तसेच हे बँक खाते उघडल्यानंतर दोन लाखपर्यंत अपघाती विम्याचे संरक्षणही लागू होते.हे खाते उघडण्यासाठी केवळ आधार कार्ड किंवा मतदार ओळखपत्राची गरज असते.जर तुमच्याजवळ आधारकार्ड असेल तर दुसरे कोणतेही कागदपत्र सादर करण्याची गरज नसते.तीन दिवशी कार्यक्रमापैकी आज तिसरा दिवस असून दिव्यातील महिलांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन भारतीय जनता पार्टी दिवा शहर महिला मोर्चाच्या अध्यक्षा सौ.ज्योती राजकांत पाटील यांनी आवाहन केले आहे