भाजप दिवा शहर महिला मोर्च्या दिव्याच्या विजयाची शिल्पकार ठरणार – मृणाल पेंडसे
ठाणे, दिवा ता 11 नोव्हे (संतोष पडवळ) : आमदार व ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष श्री निरंजन डावखरे व आमदार श्री संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे शहर महिला मोर्च्या अध्यक्षा मुणाल पेंडसे मॅडम ठाणे शहर सरचिटणीस कैलासजी म्हात्रे दिवा शहर मंडल अध्यक्ष रोहिदास मुंडे यांच्या उपस्थितीत दिवा महिला मोर्च्या अध्यक्षा ज्योती राजकांत पाटील यांच्या दिवा भाजप महिला मोर्चा ची पदनियुक्ती ती मोठ्या प्रमाणात जाहीर करण्यात आली या वेळी दिवा महिला मोर्च्या सरचिटणीस सौ.सुहासिनी गुळेकर सरचिटणीस सौ.साधना सिंग उपाध्यक्ष सौ.अमीता तांबे उत्तर भारतीय महिला मोर्चा अध्यक्षा सौ.सुनीता प्रजापती अनुसूचित जाती महिला मोर्चा अध्यक्षा सौ.सोनाळी वीर युवती मोर्चा कु. विनीता महेश दांडेकर आदी महिलांची पदनियुक्ती जाहीर करण्यात आली. दिव्यात ज्योती राजकारण पाटील या महिलांच्या अध्यक्षा असून एक आक्रमक महिलांचा चेहरा म्हणून दिव्यात महिलांचे प्रश्न ते जिगरीने उचलत असून त्यांच्या कामाला प्रभावित होऊन अनेक महिला या भारतीय जनता पार्टीमध्ये सामील होत आहेत आणि ही महिलांची ताकदच उद्या भाजपचे नगरसेवक निवडून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा असेल असे ठाणे शहर महिला मोर्चा अध्यक्ष मृणाल पेंडसे यांनी सांगितले